Admission

कला शाखा प्रथम वर्ष (F.Y.B.A.)

  • महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही उच्च माध्यमिक बोर्डाची १२वी कला,विज्ञान,वाणिज्य परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी प्रथम वर्ष कला वर्गाच्या प्रवेशासाठी पात्र आहे.
  • १७ नं.चा १२ वी परीक्षा फॉर्म भरून बहिस्थ म्हणून उत्तीर्ण झालेला असल्यास प्रवेशासाठी पात्र राहील.
  • १२ वी होऊन डी.एड.झालेला मात्र शिक्षक प्रशिक्षक मंडळाचे इंग्रजीसह पास झालेला असल्यास प्रवेशासाठी पात्र राहील .
  • १० वी पासहोऊन डी.एड.झालेला मात्र शिक्षक प्रशिक्षक मंडळाचे इंग्रजीसह परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला मायग्रेशन सर्टिफिकेट सोबत जोडावे लागेल.
  • वरील शिवाय मा.विद्यापीठाने प्रथम वर्षात प्रवेशासाठी नमूद केलेला अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात चौकशी करून त्या परीक्षा घेणा-यामंडळाची नावे जणू घ्यावी लागतील.
  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिपत्रकान्वये विविध शुल्कांची पुनर्रचना होऊन सुधारित शुल्क रचना लागू झाल्यास त्यानुसार होणारा बदल विद्यार्थ्यांना बंधनकारक राहील.
  •  प्रथम वर्ष कला व विज्ञान वर्गाच्या परीक्षा घेणा-या मंडळाची नावे जाणून घ्यावी लागतील.
  • शैक्षणिक वर्ष सन २०१०-११ पासून प्रथम वर्ष कला वर्गाला (semester)लागू करण्यात आली आहे . प्रत्येक विद्यार्थ्याला नमूद केलेल्या खालील विषयापैकी सहा विषय निवडावे लागतील व सत्र पध्दतीत प्रत्येक विषयाचा पेपर ५० गुणांचा असेल (४० गुण विद्यापीठ + १० गुण अंतर्गत परीक्षा )व वर्षात प्रत्येक विषयाचे दोन सत्र असतील.व विषयांचे गट पुढीलप्रमाणे
    • गट अ सक्तीचे इंग्रजी गट ब मराठी
      गट क हिंदी गट ड अर्थशास्त्र/ ऐच्छिक
      गट इ राज्यशास्त्र/संरक्षणशास्त्र गट फ इतिहास
      गट ग भूगोल
  • पर्यावरणशास्त्र विषय सर्वांसाठीसाक्तीचा असून परीक्षा विद्यापीठाची ८० गुणांची व अंतर्गत प्रात्यक्षिक २० गुणांचे राहतील.
  • गट अ मधील विषय सर्वांसाठी सक्तीचा आहे.
  • राहिलेल्या प्रत्येक गटातून फक्त एक याप्रमाणे ५ विषय निवडता येतील.
  • ऐच्छिक इंग्रजी विषय घेणा-याविद्यार्थ्यास मराठी /हिंदी यापैकी एकच भाषा घेता येईल.
  • प्रथम वर्ष कला वर्गातील विद्यापीठ नियमानुसार वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे ,तसे न केल्यास विद्यापीठ निकाल राखून ठेवील.

कला शाखा द्वितीय वर्ष (S.Y.B.A.)

आपल्या महाविद्यालयात पुठील प्रमाणे स्पेशल व जनरल पेपर द्वितीय वर्ष कलासाठी शिकवले जातील
सक्तीचा विषय :इंग्रजी
स्पेशल : मराठी,इतिहास,इंग्रजी,हिंदी,भूगोल
जनरल : मराठी, हिंदी,अर्थशास्त्र,राज्यशास्त्र, इतिहास, इंग्रजी(ऐच्छिक), भूगोल, संरक्षणशास्त्र
प्रथम वर्ष कला सर्व विषय उत्तीर्ण किंवा A.T.K.T. झालेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्ष कला वर्गात प्रवेश मिळेल. इंग्रजी स्पेशल घेणा-या विद्यार्थ्याने प्रथम वर्ष कालासाठी ऐच्छिक इंग्रजी घेणे सक्तीचे असेल. द्वितीय वर्ष कला पासून घ्यावयाचे विशेष निवडण्यासाठी प्रथम वर्ष कलासाठी विद्यार्थ्याने तो विषय घेतला असला पाहिजे.
द्वितीय वर्षासाठी एकूण ६ पेपर्स विद्यार्थ्यांनी द्यावयाचे असतात. द्वितीय वर्षासाठी प्रत्येकी ऐक पेपर सक्तीचा इंग्रजी असेल. द्वितीय वर्षासाठी पुठील प्रमाणे अभ्यासक्रम विद्यार्थ्याला अभ्यासावायाचा आहे.

१) सक्तीचे इंग्रजी
२) विद्यार्थ्याने घेतलेल्या स्पेशल विषयाचा पेपर (एस-१)
३) विद्यार्थ्याने घेतलेल्या स्पेशल विषयाचा पेपर (एस-२)
४) विद्यार्थ्याने घेतलेल्या स्पेशल विषयाचा जनरल विषयाचा पेपर (जी-२)
५) स्पेशल विषयाखेरीज विद्यार्थ्याने दोन जनरल विषय निवअडवेत (प्रत्येकी एकाप्रमाणे दोन पेपर)(जी-२)

विशेष सूचना

१) शैक्षणिक वर्ष २०११-१२ पासून द्वितीय वर्ष कला वर्गासाठी सत्र पध्दत लागू करण्यात आली आहे.
२) प्रत्येकविषयासाठी एका सत्रात ५० गुणांची परीक्षा असेल.
३) (४० गुण विद्यापीठ परीक्षा + १० अंतर्गत परीक्षा)वर्षभरात प्रत्येक विषयासाठी दोन सत्र असतील.
४) द्वितीय वर्ष कला वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जनरल नॉलेज (सामान ज्ञान)विषय सक्तीचा असून त्याच वर्षी विद्यापीठाची १०० गुणांची परीक्षा राहील.
५) द्वितीय वर्ष कला भूगोल एस-२ च्या पेपरला १०० गुणाची (८० + २०)वार्षिक प्रात्यक्षिक राहील.

कला शाखा तृतीय वर्ष (T.Y.B.A.)

द्वितीय वर्ष कला वर्गात दोन विषयांची ए.टी.के.टी.मिळालेला विद्यार्थी तृतीय वर्ष कला वर्गाच्या प्रवेशास पात्र राहील.विद्यार्थ्याचे द्वितीय वर्षात जे विषय असतील तेच विषय तृतीय वर्षासाठी घ्यावे लागतील.

१) सक्तीचे इंग्रजी
२) स्पेशल विषयाचा पेपर(एस-३)
३) स्पेशल विषयाचा पेपर(एस-४)
४) जनरल विषयाचा पेपर(जी-३)(घेतलेल्या स्पेशल विषय)
५) स्पेशल विषयाखेरीज विद्यार्थ्याने दोन जनरल विषयांचे पेपर(जी-३)

विशेष सूचना

१) शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून द्वितीय वर्ष कला वर्गासाठी सत्र पध्दत लागू करण्यात आली आहे.
२) प्रत्येकविषयासाठी एका सत्रात ५० गुणांची परीक्षा असेल.
३) (४० गुण विद्यापीठ परीक्षा + १० अंतर्गत परीक्षा)वर्षभरात प्रत्येक विषयासाठी दोन सत्र असतील .
४) तृतीय वर्ष कला भूगोल एस-४ च्या पेपरला १०० गुणांची(८०+२०) वार्षिक प्रात्यक्षिक परीक्षा राहील.
५) तृतीय वर्ष इंग्रजी जी-३ च्या पेपरला २० गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा राहील.


विज्ञान शाखा प्रथम वर्ष (F.Y.B.Sc.)

१) विज्ञान वर्गात खाली निर्देश केल्याप्रमाणे चार विषय घेणे आवश्यक आहे.प्रत्येक विषयासाठी दोन थेअरी व एक प्रात्यक्षिक विषय विषय राहील.
२) प्रथम वर्ष विज्ञान वर्गासाठी शैक्षणिक वर्ष २०१०-२०११ पासुन सत्र पद्धत लागू करण्यात आली आहे .
३) प्रत्येक विषयासाठी एका सत्रात ५० गुणांची परीक्षा असेल (४० गण विद्यापीठ परीक्षा +१० अंतर्गत परीक्षा) (प्रत्येक विषयाला दोन थेअरी पेपर )
४) प्रत्येक विषयाची परीक्षा ही दुस-या सत्रात (८०+२० गुणांची)घेण्यात येईल.

अ) रसायन शास्त्र
ब) भौतिक शास्त्र
क) वनस्पती शास्त्र
ड) प्राणीशास्त्र
इ) भूगोल
फ) गणित

५) पर्यावरणशास्त्र विषय सर्वांसाठीसक्तीचा असून विद्यापीठाची परीक्षा ८० गुणांची व अंर्तगत प्रात्यक्षिक २० गुणांचे राहतील.
६) रसायनशास्त्र विषय सक्तीचा आहे.

विज्ञान शाखा द्वितीय वर्ष (S.Y.B.Sc.)

१) प्रथम वर्ष विज्ञान वर्गात अभ्यासलेल्या विषयापैकी कोणतेही तीन विषय घेता येतील.
२) चौथा विषय मराठी / इंग्रजी यापैकी एक राहील.
३) द्वितीय वर्ष विज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जनरल नॉलेज (सामान्य विज्ञान)विषय सक्तीचा असेल
४) त्याच वर्षी १०० गुणांची विद्यापीठीय परीक्षा राहील.
५) द्वितीय वर्ष विज्ञान वर्गासाठी शैक्षणिक वर्ष २०१०-२०११ पासुन सत्र पद्धत लागू करण्यात आली आहे.
६) प्रत्येक विषयासाठी एक सत्रात ५० गुणांची परीक्षा असेल.
७) ४० गुण विद्यापीठ परीक्षा +१० गुण अंतर्गत परीक्षा, प्रत्येक विषयाला दोन थेअरी पेपर
८) प्रत्येक विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा ही दुस-या सत्रात (८०+२० गुणांची) घेण्यात येईल.

विज्ञान शाखा तृतीय वर्ष (T.Y.B.Sc.)

१) रसानशास्त्र हा विषय विशेष स्तरावर अभ्यासता येईल.
२) तृतीय वर्ष विज्ञान वर्गा साठी सत्र पद्धत करण्यात आली आहे
३) प्रत्येक विषयासाठी प्रत्येक सत्रात ५० गुणांची परीक्षा राहील (४० गुण विद्यापीठ परीक्षा + १० गुण अंतर्गत परीक्षा).

सत्र (Term) मंजुरीसाठी महत्वाच्या अटी:
केवळ महाविद्यालयात नाव दाखल केले व फी भरली म्हणजे सत्र मंजूर होत नाही. सत्र मंजूर होण्यासाठी पुठील गोष्टी आवश्यक आहेत.
अ) सर्व विषयांसाठी किमान ७५% हजेरी
ब) प्रत्येक विषयासाठी नेमलेले स्वाध्याय प्रश्नाची उत्तरे सामाधानकारक अभ्यासपूर्ण लिहून वेळेवर पूर्ण करणे.
क) फी वेळेवर देणे.
ड) सर्व अंतर्गत परीक्षांना बसून समाधानकारक प्रगती.
इ) महाविद्यालयात,वर्गात व व्यतिरिक्त होणा-या कार्यक्रमात सहभागी होणे.
फ) त्याचे वर्गात इतर कार्यक्रमात वेळोवेळी वर्तन सभ्य व शिस्तप्रिय असावे.
ग) या माहिती पत्रात निर्देश केलेल्या परीक्षा पध्दतिच्या दृष्टीने आवश्यक असणा-या अटींचे पालन करणे.
ह) सर्व वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
म) प्रवेश घेतेवेळी फी भरल्याबद्दलची पावती घ्यावी.अन्यथा प्रवेश घेतल्याचे मान्य केले जाणार नाही.

वरील नियमांचे विद्यार्थांचे सत्र मंजूर होणेसाठी गरजेचे आहे.